पंतप्रधान मोदींवर अभिनेते प्रकाश राज यांचे टीकास्त्र; म्हणाले, ‘हे फक्त निवडणूकांसाठीच…’

काळाराम मंदिराच्या पूजेसह पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरामध्ये साफसफाई देखील केली. यावर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी खोचक टीका केली आहे.

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकमधील काळाराम मंदिराची (Nashik Kalaram Mandir) पूजा अर्चना केल्यापासून अनेक राजकीय वार पलटवार केले जात आहे. काळाराम मंदिराच्या पूजेसह पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरामध्ये साफसफाई देखील केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांनी खोचक टीका केली आहे.

    पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमधील मंदिराची साफसफाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यापर्यत देशभरामध्ये मंदिर स्वच्छता मोहिम करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. मोदींवर अनेकांनी टीका केल्यानंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनी देखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आगामी निवडणूकामुळे हे चालले असल्याची टीका प्रकाश राज यांनी केली आहे.

    अभिनेते प्रकाश राज हे नेहमी सोशल मीडियावर आपले मत परखडपणे मांडताना दिसतात. अनेक चालू घडामोडींवर अभिनेते प्रकाश राज ट्वीटवर मत मांडतात. त्यांच्या या मतांमुळे अनेकदा त्यांना ट्रोल देखील केले जाते. आता पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदी यांना स्वच्छता मोहिमेवरुन डिवचले आहे. काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेचा फोटो शेअर करत अभिनेते प्रकाश राज म्हणाले, “मोदी यांचा हा राजकीय विषय आहे. मोदींच्या राजकारणाचा हा एक भाग आहे. तुम्हाला काय दिसत नाही का, अशी स्वच्छता करुन तुमचे मत मागण्याचा हा प्रकार आहे” अशी खोचक टीका अभिनेते प्रकाश राज यांनी केली. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.