tunisha sharma and sheezan khan

शिझान खान (Sheezan Khan) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाच्या (Tunisha Sharma Suicide Case) चौकशीत नीट काही बोलत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. पोलिसांनी प्रश्न विचारल्यानंतर तो एकतर गप्प राहतो किंवा वेगवेगळी विधानं करतो. त्याच्या मोबाईल फोनवरूनही कोणतेही संशयास्पद चॅट समोर आलेले नाही.

  तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता शिझान खानच्या (Sheezan Khan) पोलीस कोठडीत 30 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असलेला आरोपी शिझान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. यावेळी शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  याआधी 25 डिसेंबरला शिझानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करुन 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  तुनिषा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. दरम्यान शिझानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तुनिषाची आत्महत्या नक्की कशामुळे झाली हे समोर आलेले नाही. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलीस शिझान खानची चौकशी करत आहेत. शिझान एकाचवेळी अनेक मुलां डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.

  वारंवार जबाब बदलतोय शिझान खान
  शिझान खान मागच्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलीस त्याची चौकशी करत आहेत पण तो वारंवार त्याचा जबाब बदलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच आतापर्यंत त्याने कोणतीही विशेष माहिती दिलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत शिझानची कोठडी २ दिवसांनी वाढवली आहे.

  सिक्रेट गर्लफ्रेंड कोण?
  शिझान खान तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत नीट काही बोलत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. पोलिसांनी प्रश्न विचारल्यानंतर तो एकतर गप्प राहतो किंवा वेगवेगळी विधानं करतो. त्याच्या मोबाईल फोनवरूनही कोणतेही संशयास्पद चॅट समोर आलेले नाही. त्याची एक सिक्रेट गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानंतर कोर्टाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.