पूजा हेगडेला इंडिगो विमान कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक, एअरलाइनने मागितली माफी

पूजाच्या ट्विटला एअरलाइनकडून तातडीनेप्रतिसाद मिळाला आणि समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात पूजा आणि तिच्या टीमला झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

    तामिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा हेगडेने ( Pooja Hegde ) गुरुवारी इंडिगोच्या एका कर्मचार्‍याला फैलावर घेतले. त्या व्यक्तीने अभिनेत्री आणि तिची टीम मुंबईबाहेर जात असताना विनाकारण कास्टूम असिस्टंटसोबत असभ्य वर्तन केले होते.

    ट्विटरवर पूजा हेगडेने लिहिले की, “विपुल नकाशे नावाच्या इंडिगो ( IndiGo6E ) स्टाफने आज मुंबईहून निघालेल्या फ्लाइटमध्ये आमच्याशी किती उद्धट वर्तन केले, याबद्दल अत्यंत दुःखी आहे. विनाकारण आमच्याशी उर्मट, अज्ञानी आणि धमकावणाऱ्या आवाजात तो आमच्याशी बोलला.खरंतय असा अडचणींबद्दल मी सहसा ट्विट करीत नाही, परंतु हे खरोखरच भयावह होते.”
    पूजाच्या ट्विटला एअरलाइनकडून तातडीनेप्रतिसाद मिळाला आणि समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात पूजा आणि तिच्या टीमला झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.