पूजा सावंतनं सिद्देश चव्हाणसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो आला समोर!

अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतचं अभिनेता अजिंक्य ननावरे अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नबंधनात अडकले. व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर अभिनेता प्रथमेशनं (Prathamesh Parab) गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत (kshitija ghosalkar) साखरपुडा केला. आता मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री पूजा सांवतनं (Pooja Sawant) सिद्देश चव्हाणसोबत (Siddesh Chavan) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह सेलेब्रिटीही तिला शुभेच्छा देताना दिसत आहे.

  गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री पुजा सांवत चर्चेत आहे. मागच्या वर्षी तिने सोशल मीडियावर तिचा एका तरुणासोबतच फोटो शेयर करत तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाल्याचं सांगितलं होतं. या फोटोमध्ये तिच्या ड्रिम मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने अनेकांनी तिला तो कोण आहे हे विचारलं होत. चाहत्यासोबत सेलिब्रिटिंहीना उत्सुकता होती की नेमका तिच्या आयुष्याचा जोडीदार कोण आहे. नंतर तिने मीडियासमोर तिच्य मिस्ट्रीमॅनचा चेहरा दाखवत त्याच्यासोबतचे फोटो शेयर केले होते. तेव्हापासून पुजा सांवतच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता अखेर पुजाने सिद्देश चव्हाणसोबत साखरपुडा उरकला असून सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता पूजाच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

  पूजाने साखरपुड्यादरम्यान हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, हार असा लूक केला होता. तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता.

  ‘या’ कलाकरांसोबत जोडलं होतं नाव

  पूजा सांवत सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेयर करत असते. मात्र, पूजाचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सोबत जोडण्यात आलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. नुकताच तिचा मुसाफीरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पुष्कराज चिरपुटकर, दिशा परदेशी यांच्याही प्रमुख भुमिका आहेत. तुम्हाला तुमच्या मैत्रीची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे.