पूजा सावतंला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार, सिद्धेश चव्हाणसोबत उरकला साखरपुडा!

पुजाने सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

  मंगळवारी (28 नोव्हेंबर) अभिनेत्री पूजा सांवतने (Pooja Sawant) सोशल मीडियावर एक तिचा एका तरुणासोबतच फोटो शेयर करत तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाल्याचं सांगितलं होतं. या फोटोमध्ये तिच्या ड्रिम मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने अनेकांनी तिला तो कोण आहे हे विचारलं होत. चाहत्यासोबत सेलिब्रिटिंहीना उत्सुकता होती की नेमका तिच्या आयुष्याचा जोडीदार कोण आहे. अखेर तिने या मिस्ट्रीमॅनचा चेहरा दाखवला असून, त्याच्यासोबतचे फोटो शेयर केले आहे.

  पुजाने नुकतंच इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोत तिच्या मिस्ट्रीमॅनसोबत दिसत आहे. ज्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. पुजाने सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. “आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”. असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे.या फोटोवर चाहत्यांसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट केले आहे. मानसी नाईक,आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर जोग अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत या नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

  ‘या’ कलाकरांसोबत जोडलं होतं नाव

  पूजा  सांवत सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेयर करत असते. मात्र,  पूजाचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सोबत जोडण्यात आलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.