प्रसिद्ध पॉपस्टार क्रिस वूला बलात्कार प्रकरणी 13 वर्षांचा तुरुंगवास

डू मीझू नावाच्या तरुणीने क्रिस वूवर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वी ती क्रिसला भेटली तेव्हा तिचं वय 17 वर्षे होतं. क्रिसच्या घरी ती एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली असून तिचं लैंगिक शोषण करण्यात आले.

    चीनचा प्रसिद्ध पॉपस्टार क्रिसचं (kris wu )नाव सध्या चांगलच चर्चेत आहे. बलात्कार प्रकरणी त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    एका तरुणीने पॉपस्टार क्रिसलवर बलात्काराचा आरोप केला होता. डू मीझू ही तरुणी दोन वर्षांपूर्वी क्रिसला भेटली तेव्हा तिचं वय 17 वर्षे होतं. क्रिसच्या घरी ती एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली असून तिचं लैंगिक शोषण करण्यात आले. असा तिनं म्हण्टंल होतं. यानंतर मागच्या वर्षी बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी क्रिसला अटक केली होती. त्यानंतर आणखी 24 मुलींनी पुढे येत क्रिस विरोधात साक्ष दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याची तीन ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असते. पण कधी-कधी जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षादेखील होऊ शकते.

    क्रिसचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे. तो तरुणाीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. तसेच तो लोकप्रिय गायक असल्याने अनेक मोठ-मोठ्या ब्रॅंड्ससोबत तो काम करत असतो. पण बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रॅंड्सनी क्रिससोबतची भागीदारी संपवली. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचादेखील समावेश होता. कमी वयात त्याने नाव कमावलं होतं.