‘हृदयी वसंत फुलताना’ वर पुन्हा ठेका धरायला व्हा तयार! गाणं नव्या रुपात येणार टकाटक 2’मध्ये

टकाटक 2 या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याच्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे.

    ‘हृदयी वसंत फुलताना’ वर पुन्हा ठेका धरायला व्हा तयार! नव्या रुपात येणार टकाटक 2’मध्ये
    मराठी चित्रपट रसिकांमध्ये अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi). हा सिनेमा कुणी पाहिलां नाही असा व्यक्ती शोधूनही सापाडणार नाही. रसिकांच्या मनात प्रेमाचा वंसत फुलवणारं ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे एव्हरग्रीन गाणं अजूनही त्यांच्या ओठी आहे. आाता हे गाणं पुन्हा एकदा धमाल करण्यास सज्ज झालं आहे. ‘टकाटक 2’ (Takatak 2) या सिनेमातून हे गाणं भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या संदर्भातील घोषणा केली.

    मराठी चित्रपट सृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेलेत ज्यांची क्रेझ अजुनही लोकांवर आहे. त्यापैकी अशी ही बनवाबनवी(Ashi Hi Banwa Banwi). हा एक चित्रपट आहे. या चित्रपटाील सगळी गाणी आजही तितकीचं पाप्युलर आहे. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं ‘हृदयी वसंत फुलताना…’ (Hridayi Vasant Fultana) हे ‘अशी ही बनवाबनवी’मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन सीक्वेल ‘टकाटक 2 या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.


    या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद कवडे यांचं आहे. या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याच्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंटने पॅरिस-मुख्यालय असलेल्या Believe (बीलिव्ह) डिजिटल म्युझिक कंपनीकडून ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचं रुपांतरण आणि संक्रमण अधिकार मिळवले आहेत. ज्याने भारतातील प्रतिष्ठित संगीत रेकॉर्ड लेबलांपैकी एक आणि व्हीनस वर्ल्डवाइडचा भाग असलेल्या व्हीनस म्युझिकचे अधिग्रहण केले होते. या करारामुळे 2021 मध्ये व्हीनस म्युझिकला इश्तार म्युझिक असं नाव देण्यात आलं आहे. हे गाणं इश्तार म्युझिकच्या युट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर 6 ऑगस्टपासून संगीतरसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

    चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक 2’ची कथा-पटकथा लिहिली आहे. लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. 18 ऑगस्ट रोजी ‘टकाटक 2’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.