‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती ? चर्चांना आले उधाण

रिया चक्रवर्ती(Rhea Chakraborty) बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या(Salman Khan) ‘बिग बॉस १५’(Bigg Boss 15) या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार,अशी चर्चा सुरु आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, दलजीत कौर आणि रिया चक्रवर्ती हे एकाच स्टुडिओच्या बाहेर दिसल्यामुळे रिया(Rhe Chakraborty To Enter In Bigg Boss 15) बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती(Rhea Chakraborty) चर्चेत आली होती. आता रिया बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या(Salman Khan) ‘बिग बॉस १५’(Bigg Boss 15) या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार,अशी चर्चा सुरु आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, दलजीत कौर आणि रिया चक्रवर्ती हे एकाच स्टुडिओच्या बाहेर दिसल्यामुळे रिया(Rhe Chakraborty To Enter In Bigg Boss 15) बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  रियाने बिग बॉस १५मध्ये सहभागी होण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार आहे की पहिल्याच दिवशी स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी परफॉर्म करणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

  बिग बॉस १५ हा शो २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरं काय ते २ ऑक्टोबरलाच शो सुरु झाल्यावर समोर येईल.