प्राजक्ता माळीने घरातच साजरा केला हापूस आंबा महोत्सव

कोरोनामध्ये बंद घरांतील लाखो लोकांना आपला जीव धोक्यात घालून, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून थेट घरपोच होणारा भाजीपाला व फळे घेऊन त्यांच्याप्रती जो अभिमान व जी संवेदना तिने गेल्यावर्षी दाखविली तसाच अभिमान यावर्षी आंबा खरेदी करतानाही दाखविला.

  मुंबई : महाराष्ट्राची ”स्माईल क्वीन” प्राजक्ता माळी हिचे मधुर हास्य जसे प्रसिद्ध आहे, तितकेच तिचे हापूस आंब्यांवर असलेले प्रेमसुद्धा. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांचा मोसम सुरू होत असतानाच थेट बागेतून आलेल्या आवडत्या ताज्या हापूसची चव कधी एकदा चाखतो असे झालेल्या प्राजक्ताने आपल्या घरी स्वतः व कुटुंबासाठी चक्क आंबा महोत्सवच साजरा केला व या हापूस बरोबरच विविध जातीच्या आंब्यांची मजा लुटली.

  त्याचबरोबर, हापूस आणि विविध जातीच्या आंब्यांचा या वर्षीचा मुहूर्त केला. लॉकडाऊनच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकांना आपल्या शेतातला ताजा, स्वच्छ व आहारासाठी पोषक भाजीपाला व फळे ऑनलाईन पद्धतीने घराच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘किसानकनेक्ट’ या शेतकरी मंचाने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या, आगळ्या ऑनलाईन आंबा महोत्सवातून प्राजक्ताने भरघोस आंबा खरेदी करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले व त्यांच्याकडून हजारो हापूस आंबा प्रेमींना उत्तमोत्तम आंबा खायला मिळो, ह्या शुभेच्छा दिल्या.

  कोरोनामध्ये बंद घरांतील लाखो लोकांना आपला जीव धोक्यात घालून, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून थेट घरपोच होणारा भाजीपाला व फळे घेऊन त्यांच्याप्रती जो अभिमान व जी संवेदना तिने गेल्यावर्षी दाखविली तसाच अभिमान यावर्षी आंबा खरेदी करतानाही दाखविला.

  आपल्या तब्येतीच्या व आहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर असणाऱ्या प्राजक्ताने आंबे खरेदी करतानाही चोखंदळपणा दाखविला. ‘ईट राईट’चा नारा दिलेल्या किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या हापूस तसेच केसर, लालबाग, लंगडा अशा रसाळ जातींच्या आंब्यांची चव घेताना त्यांच्यातल्या पोषणमूल्यांची माहितीही तिने करून घेतली.

  या ऑनलाईन आंबा महोत्सवात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी़ही प्राजक्ताला आ़ंबा कसा निवडावा, त्याची परीक्षा कशी करावी, त्यातली पोषकद्रव्ये कोणती, आहारात आंब्याचे महत्त्व अशा अनेक विषयांवर विशेष संवाद साधत माहिती दिली.

  आंब्यांबरोबरच ताजा, पेटीबंद भाजीपालाही प्राजक्ताने खरेदी केला व लोकांना स्वच्छ व सुरक्षितपणे हाताळलेली भाजी व फळे या कोरोना काळात घराबाहेर न पडता घेण्याचे आवाहन केले.
  ‘मस्त महाराष्ट्र’ या टीव्हीवरील पर्यटन शोच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी कोकणात पोहोचलेली प्राजक्ता रत्नागिरी मुक्कामी आपले हापूस आंबा प्रेम लपवू शकली नव्हती. रत्नागिरीचा या मोसमाचा हापूस आंबा कधी तयार होईल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो थेट घरपोच व सुरक्षित रितीने मिळेल का, अशा गोष्टींची खातरजमा तिने केली होती आणि आता हापूसचा आस्वाद तिने अशाप्रकारे घरातच महोत्सवी वातावरण तयार करून घेतला.