प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव!

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही मजामस्ती करताना दिसत आहेत.

  लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकताच प्राजक्ताने तिच्या फोटोशूट दरम्यानचा शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

  प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही मजामस्ती करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने “त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन… ‘फोटोशूट करताना आम्ही दोघे नेहमी मस्ती करतो’ असं नेहमीच लिहिणार नाही. पण हा, तू काढलेल्या फोटोंमध्ये मला स्वत:ला पाहताना फार आनंद होतो” या आशयाचे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

  सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा मस्ती करतानाचा फोटो चर्चेत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)