prajakta mali diwali photos

दिवाळीच्या निमित्तानेही प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर(Prajakta Mali Shared Photos On Social Media) केले आहेत.या फोटोसोबत तिने जो मेसेज लिहिला आहे तो फारच गमतीदार आहे.

    अभिनेत्री प्राजक्ता(Prajakta Mali) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दिवाळीच्या निमित्तानेही प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर(Prajakta Mali Shared Photos On Social Media) केले आहेत.या फोटोसोबत तिने जो मेसेज लिहिला आहे तो फारच गमतीदार आहे.

    प्राजक्ताने हे फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. ‘या दिवाळीला फटाके फोडू नका तर स्वत: पटाका व्हा’, असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोला दिले आहे. प्राजक्ताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

    प्राजक्ता माळी ही सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राती हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.