प्रकाश राज यांनी गाव घेतले दत्तक, म्हणाले- ‘स्वच्छ, सुंदर रस्ते आणि…’

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. या अभिनेत्याने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रसिद्धी मिळवली आहे. प्रकाश राज हे नेहमीच समाजाच्या घडामोडींवर आपले मत मांडतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल. ते चर्चेत राहण्याचे हेही एक कारण आहे. मात्र आता ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश राज यांनी तेलंगणा राज्यातील एक गाव दत्तक घेतले आहे. महबूबनगर जिल्ह्यातील त्यांनी दत्तक घेतलेल्या गावाला 'कोंदारपिले' म्हणतात.

    विशेष म्हणजे दत्तक घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक आमदाराच्या मदतीने या गावात विकासकामे केली आहेत. तेलंगणाचे शहरी विकास मंत्री केटीआर यांनी प्रकाश राज यांनी दत्तक घेतलेल्या गावाची छायाचित्रे शेअर केली आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत केटीआरने लिहिले की, ‘हे गाव प्रकाश राज यांनी दत्तक घेतले आहे. स्थानिक आमदाराच्या मदतीने गावाचा विकास उल्लेखनीय आहे.

    केटीआरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गावातील रस्ते पक्के झालेले दिसत आहेत. चित्रांमध्ये स्वच्छ, सुंदर रस्ते आणि दोन्ही बाजूला लावलेली झाडे दिसत आहेत. प्रकाश राज यांनी गाव दत्तक घेऊन नवा आदर्श ठेवला आहे. प्रकाश राज यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने वॉन्टेड, हिरोपंती, सिंघम, गोलमाल अगेन, दबंग या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.