आता १०० रूपयात बघा नाटक, सहकुटुंब नाटकाचा आस्वाद घेता यावा यासाठी प्रशांत दामले यांनी घेतला निर्णय!

“हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” अशा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.

  लॉकडाऊन नंतर नाट्यगृह पुन्हा एकदा सुरू झाली. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नाटकं सुरू झाली. पण अजूनहा हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत नाहीये. इच्छा असूनही सर्वसामन्य मराठी कुटुंबातील व्यक्ती नाटक पाहण्यासाठी जात नाही. कारण म्हणजे नाटकाची तिकीटं. सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी जाणं म्हणजे एक हजारांहून अधिक खर्च तर केवळ तिकीटांवर होतो. हीच अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलय…

  अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणुनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनी चा तिकीट दर जो आधी रु ३०० आणि रु २०० होता.. तो आता मी रु १०० ठेवीन. प्रायोगिक तत्वावर खालील दोन प्रयोगांच्या बाल्कनीचा दर रु १०० राहील.

  ‘प्रायोगिक तत्वावर फक्त गडकरी रंगायतन मधे”

  अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक…

  Posted by Prashant Damle on Wednesday, March 24, 2021

   

  सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं’ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.

  “हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” अशा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.