prashant damle

“माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय.

    मुंबई : रंगभूमीचा कॉमेडी किंग  प्रशांत दामले यांनी त्यांची व्यथा मांडणारी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये प्रशांत दामले यांनी लिहलं की, “माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात अस झालय.. सगळं पूर्ववत होऊदे बाबा लवकर”, अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी शेअर केली आहे. प्रशांत दामले यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ती पोस्ट सध्या नेटक-यांमध्ये व रसिक प्रेक्षकांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.