prashant damle

‘किचन कल्लाकार’ मध्ये प्रशांत दामले(Prashant Damle In Kitchen Kallakar) यांची काय भूमिका आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या कार्यक्रमात प्रशांत हे जजची भूमिका निभावणार आहेत.

    खवय्ये म्हटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत स्वत: छान खवय्ये आहेत. त्यांची हीच खवय्येगिरी आता प्रेक्षक पाहू शकतील झी मराठीवरील आगामी कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’मध्ये. ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar)हा नवीन कुकरी शो(Cookery Show) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्याचा प्रोमो नुकताच वाहिनीवर सादर झाला आहे.

    यामध्ये संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) म्हणताना दिसतोय की, आता भल्या-भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता  कलाकार किचनमध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    ‘किचन कल्लाकार’ मध्ये प्रशांत दामले(Prashant Damle In Kitchen Kallakar) यांची काय भूमिका आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या कार्यक्रमात प्रशांत हे जजची भूमिका निभावणार आहेत. कुठले कलाकार पाककलेचं शिवधनुष्य पेलवू शकले याचा अंतिम निर्णय हा प्रशांत घेणार आहेत. त्यामुळं कलाकारांना आता खवय्ये प्रशांत दामले यांना आपल्या पाक-कौशल्यानं प्रभावित करणं किती कठीण जाणार जाणार आहे हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.