Priya berde in bjp

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला.

    नाशिक: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Priya Berde Join BJP) राष्ट्रवादीची साथ सोडून प्रिया बेर्डे यांनी भाजपची कास धरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला.

    नाशिकमध्ये भाजप कार्यकारणीच्या कार्यक्रमातच प्रिया बेर्डे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला अलविदा करत प्रिया बेर्डे यांनी भाजपत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे. प्रिया बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

    प्रिया बेर्डे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. मात्र, दोन वर्षातच प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपला साथ दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

    प्रिया बेर्डेंची पार्श्वभूूमी
    प्रिया बेर्डे या मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ असे अनेक हिट चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले. ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ अशा हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात प्रिय बेर्डे यांनी चांगली कामगिरी केली. प्रिया बेर्डे यांनी कोरोना काळात अनेक कलाकारांना मदत केली होती. कोरोना काळात सिनेसृष्टीतील कलाकारांना केलेल्या मदतीमुळे प्रिया बेर्डे यांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्यांनी त्यानंतर मग राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंतर आता त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. प्रिया बेर्डे यांना अभिनय नावाचा मुलगा आणि स्वानंदी नावाची मुलगी आहे.