priyanka chopra

संगीतामुळं जगातील दुसरा देश एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाल्याचंही प्रियांकानं सांगितलंय. त्यावेळेपर्यंत फिल्म इंडस्ट्रीत बऱ्यापैकी काम केलं होतं. आता यापुढं करत राहावं असं वाटत नव्हतं. त्यामुळं जेव्हा संगितात करिअरची ऑफर आली तेव्हा हे सगळं टाकून पळून गेल्याचं तिनं सांगितलंय.

मुंबई: हॉलिवूडमध्ये (Hollywood) का गेली, या प्रश्नाचं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) उत्तर देत पहिल्यांदा या सगळ्यावर मौन सोडलंय. बॉलिवूडमध्ये (Bollywood) लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, तिनं बॉलिवूड सोडून सिंगिंग सुरु केलं होतं. अमेरिकेत काम शोधण्यासाठी ती आली, असं प्रियांकानं पॉडकॉस्ट शो आर्मचेयर एस्क्सपर्टमध्ये सांगितलंय. बॉलिवूडमध्ये मनासारखं काम मिळत नव्हतं, तसंच इंडस्ट्रीतल्या राजकारणामुळं ती नाराज झाली होती, असंही प्रियंकानं सांगतिलंय. बॉलिवूडमध्ये तिला मिळत असलेल्या भूमिकांबाबत ती समाधानी नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय.

बॉलिवूडमधल्या कामावर का नव्हती खूश
‘सात खून माफ’चं शूटिंग सुरु असताना, म्युझिक देशी हिट्सच्या अंजली आचार्यनं प्रियांकाला फोन केला होता. तिनं प्रियांकाचा एक म्युझिक व्हिडिओ पाहिला होता. तो पाहून तिनं प्रियांकाला अमेरिकेत म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्याचवेळी प्रियांकाच्या मनातही बॉलिवूड सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार सुरु होता. असं प्रियांकानं सांगितलंय.

या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते, असं तिनं म्हटलय. इंडस्ट्रीत आपल्याला एका कोपऱ्यात ढकलण्यात येत होतं. अनेक जणं तिला काम देत नव्हते. या सगळ्या खेळात रमण्याची इच्छा नव्हती. त्यावर अनेकांबाबत नाराजी होती. या सगळ्या राजकारणानं थकून गेल्यानं ब्रेक हवा होता. असंही प्रियांकानं स्पष्ट केलंय.

अमेरिकेते जाऊन म्युझिक इंडस्ट्रीत मिळाली संधी
संगीतामुळं जगातील दुसरा देश एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाल्याचंही प्रियांकानं सांगितलंय. त्यावेळेपर्यंत फिल्म इंडस्ट्रीत बऱ्यापैकी काम केलं होतं. आता यापुढं करत राहावं असं वाटत नव्हतं. त्यामुळं जेव्हा संगितात करिअरची ऑफर आली तेव्हा हे सगळं टाकून पळून गेल्याचं तिनं सांगितलंय. 2012 साली तिनं म्युझिक करिअरला सुरुवात केली. तिचं पहिलं गाणं ‘इन माय सिटी’ हे होतं. इतरही अनेक गाणी तिनं गायली. 2015 साली मेरी कोम सिनेमासाठी तिनं पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये गाणं गायलं.

म्युझिकमध्ये करिअर झालं नाही, अभिनयानंच मिळाली ओळख
अमेरिकेत म्युझिक इंडस्ट्रीत काम केलं पण तिथं फारसं यश हाती येत नव्हतं. त्यामुळं अमेरिकेत अभिनय क्षेत्रात काम करण्याची तयारी तिनं सुरु केली. प्रियांकानं बॉलिवूडमध्ये 53 सिनेमांत काम केलंय. 2015 पासून प्रियांका बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नाही. ती आता हॉलिवूड सिनेमे आणि आंतरराष्ट्रीय शोमधून तिची ओळख निर्माण करत आहे.