priyanka chopra on british vogue cover

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता ब्रिटीश वोग मासिकावर (British Vogue Magazine) झळकली आहे. प्रियांका या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

  अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’ म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांच्या कव्हर पेजवर झळकली आहे. आता प्रियांकाने आणखी मोठी मजल मारली आहे. प्रियांका आता ब्रिटीश वोग मासिकावर (British Vogue Magazine) झळकली आहे. प्रियांका या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by British Vogue (@britishvogue)


  ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये दिसत आहे. पिवळ्या कलरचं जॅकेट अन् मोकळे केस अशा लूकमध्ये ती दिसत आहे. प्रियांकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका ही तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by British Vogue (@britishvogue)

  प्रियांका आगामी काळात ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटामधून आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिकेत आहे. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा चित्रपट कॅरोलिन हरफर्थच्या 2016 च्या जर्मन चित्रपट ‘SMS फर डिच’ वर आधारित आहे.फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटामध्ये देखील प्रियांका प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबतच अभिनेत्री आलिया आणि अभिनेत्री कतरिना कैफ या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. देसी गर्लच्या नव्या चित्रपटांची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.