होळीच्या पार्टीत पती निक जोनससोबत प्रियांकाचा जबरदस्त डान्स, मुलगी मालतीसोबतही सेलेब्रेशन; फोटो व्हायरल!

होळीच्या पार्टीमध्ये प्रियंका तिच्या कुटुंबियासोबत उपस्थित होती. यावेळी तिनं पती निक जोनाससोबत जबरदस्त डान्सही केला.

    सोमवारी देशभरात होळीची धूम पाहायला मिळाली. होळी साजरी करण्यात कलाकार मंडळीही मागे राहत नाही. अनेक सेलेब्रिटी मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत होळी साजरी करतात. देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या भारतात आहे. सोमवारी प्रियांकानं एका होळी पार्टीला हजेरी लावली. या होळीच्या पार्टीदरम्यान प्रियंका तिच्या कुटुंबीयांसह मित्रांसोबत मस्ती करताना दिसली. यावेळी प्रियंकासोबत तिचा पती निक जोनासही दिसला. पार्टीदरम्यान प्रियांकाने मुलगी मालतीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते जे व्हायरल होत आहेत.

    प्रियंकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    या फोटोंमध्ये प्रियंका मुलगी मालतीला आपल्या मांडीत धरुन  दिसत आहे. त्याचवेळी मालती देखील कॅमेऱ्यासमोर अतिशय सुंदर पोज देताना दिसत आहे, तर या फोटोमध्ये निक तिच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये, प्रियांका तिच्या कुटुंबीयांसह आणि जवळच्या मित्रांसह दिसत आहे, जी पूर्णपणे होळीच्या रंगात सजलेली दिसत आहे.

    होळीच्या पार्टीमध्ये प्रियंका पांढऱ्या चुरीदार सूटमध्ये दिसली होती. त्याचवेळी निक जोनासही पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. इतर छायाचित्रांमध्ये हॉलिवूड स्टार होळीचा आनंद लुटताना दिसत आहे. प्रियांकाने हे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले, जे काही वेळातच व्हायरल झाले.

    सध्या प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री आजकाल अनेक चित्रपट निर्मात्यांना भेटत आहे आणि अनेक स्क्रिप्ट वाचत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या प्रियांका संजय लीला भन्साळी यांच्यासोबत एका चित्रपटाची चर्चा करत आहे. यासंबंधीची माहिती लवकरच समोर येईल अशी आशा आहे.