Priyanka Chopra

'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडनदेखील दिसून येणार आहे.

    बॅलिवूडसह हॅालिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीज मधून आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिची आगामी वेब सिरीज सिटाडेल लवकरच पाहायला मिळणार आहे. नकुतीच या वेबसिरीजची शूटिंग पूर्ण झाली झाल्याची माहिती प्रियांकने दिली आहे.

    प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतचं तिने फादर्स डे निमित्ता तिच्या लेकीचा आणि निक जोनासचा फोटो शेयर करत शुभेच्छा देत पोस्ट शेयर केली होती. त्याला मोठ्या प्रमाणावर चांहत्यानी पंसती दर्शवली होती. आता  ‘सिटाडेल’ वेबसिरीजची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. प्रियकांने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियंकाने शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

    ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडनदेखील दिसून येणार आहे. रिचर्ड मॅडन ‘गेम्स ऑफ थ्रोंस’मध्ये दिसून आले होते. त्यामुळे प्रेक्षक आता ‘सिटाडेल’ या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.