‘मी खूप एकटी पडले होते, तो एक भयानक अनुभव होता’ हॅालिवूडमधील सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलली प्रियंका!

हॅालिवूड ही एक अशी इंडस्ट्री होती ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तिथल्या लोकांना मी ओळखत नव्हतो. अडचणीत मदतीला येणारे मित्र नव्हते. असं ती हॅालिवूडमधल्या संघर्षातील दिवसांबद्दल बोलली.

  एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कायम चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आणि वैयत्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच ती भारतातून अमेरिकेत परतली आहे. अमेरिकेत जाताच तिनं तिच्या नव्या चित्रपटाची शूटींग सुरू केली आहे. पण बॅालिवूड ते हॅालिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियंकाच आयुष्य दिसतं तितकं सोपं नव्हतं. एका मुलाखती दरम्यान तिनं सांगितल की तिला हॉलिवूडमध्ये (Priyanka Chopra On Hollywood) सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला होता आणि ती यातून कशी सावरली हे सुद्धा तीनं सांगितलं.

  काय म्हणाली प्रियंका

  बॉलिवूड नतंर हॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उपटवणारी प्रियांका चोप्राचे जगभरात फॅन्स आहेत. प्रियांकाने ही ओळख स्वतःच्या बळावर तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी देसी गर्ल 2017 मध्ये हॉलिवूडमध्ये गेली. तिने बेवॉचमधून हॅालिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळच्या संघर्षाच्या दिवसाबद्दल बोलताना ती म्हणाली की, हॅालिवूड ही एक अशी इंडस्ट्री होती ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तिथल्या लोकांना मी ओळखत नव्हतो. अडचणीत मदतीला येणारे मित्र नव्हते. ते खूप महत्वाचे होते. मी खूप एकटी होतो आणि हा खूप भयानक अनुभव होता. हे सर्व न्यूयॉर्क शहराबद्दल होते, जे अजूनही एक आव्हानात्मक शहर आहे. माझ्या आयुष्यातील तो काळ काळा होता.

  करिअर सुरू करणं कठीण होतं

  प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली की, तिच्या देशात खूप प्रभाव असूनही तिला तिथून पुन्हा करिअर सुरू करण्यास कठीण गेलं. सुरुवातीला लोकांनी तिला भेटण्यासही नकार दिला, हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र, या कठीण काळातही प्रियंका खंबीरपणे हिंमतीने उभी राहिली आणि स्वत:ला तुटण्यापासून वाचवलं.

  प्रियांकाचं वर्कफ्रंट

  सध्या प्रियांका चोप्रा तिच्या आगामी चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’ची शूटिंग करत आहे. याशिवाय गेल्या महिन्यात त्यांनी ‘ब्लफ’ चित्रपटाचीही घोषणाही केली होती. तिचा आवाज असलेली टायगर डॅाक्युमेंट्री रिलीज झाली असून डिस्नेप्लस हॅाटस्टारवर तुम्ही ती पाहू शकता. नुकतीच प्रियांका चोप्रा भारत दौऱ्यावर होती. यावेळी त्यांनी कुटुंबासह येथे होळीचा सणही साजरा केला. याशिवाय तिने अयोध्येत सहकुटुंब जाऊन राम मंदिरालाही भेट दिली होती.