‘मी माफ केलं, आणि पुढे निघून गेले..’ बॅालिवुडवर निशाणा साधल्यानंतर प्रियांकाच्या या वक्तव्यानं पुन्हा वेधलं लक्ष!

मग माझ्यासोबत जे घडलंय ते आता विसरले आहे. आता मी आणखी आत्मविश्वासी आहे म्हणूनच सुरक्षित जागेत खुल्या पद्धतीने याबद्दल बोलणे माझ्यासाठी सोपे होते.” असं प्रियांका म्हणाली.

हॉलिवूडमध्ये (Hollywood) का गेली, या प्रश्नाचं उत्तर देउन खबळळ माजवुन देणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) पुन्हा एकदा या संदर्भात प्रश्न विचारल्यावर खळबळ जनक विधान केलं आहे. प्रियांका तिच्या आगामी वेबसिरीज सिटाडेलचं प्रमोशन करण्यासाठी मुंबईत आली आहे. तिच्यासोबत अभिनेता रिचर्ड मॅडेनसुध्दा काल  एशिया पॅसिफिक पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. यावेळी तिने बॉलिवूडमधून निघून जाण्याच्या प्रवासाबादल बोलताना बिनधास्तपणे उत्तर दिलं.

काय म्हणाली प्रियांका

पॉडकॉस्ट शोमध्ये तेव्हा मला माझ्या आयुष्याच्या प्रवासाविषयी विचारण्यात आले आणि मी लहान असताना, मी 10 किंवा 15, 22, 30 किंवा 40 वर्षांची असताना, काहीही असो. मी माझ्या प्रवासातील सत्याबद्दल बोलत होतो. आता, माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्याबद्दल बोलण्याचा मला पुरेसा आत्मविश्वास होता. मला वाटते की आता मी कुठे आहे, मला जे वाटले ते व्यक्त करण्यास मी पुरेसे ठीक आहे. मला वाटते की जे घडले त्याच्याशी माझे खूप चुकीचे होते परंतु मी आता मी त्यांना माफ करुन मी खूप पुढे गेले आहे आणि मग माझ्यासोबत जे घडलंय ते आता विसरले आहे. आता मी  आणखी आत्मविश्वासी आहे  म्हणूनच सुरक्षित जागेत खुल्या पद्धतीने याबद्दल बोलणे माझ्यासाठी सोपे होते.”

बॉलिवूडबद्दल नेमंक काय म्हणाली होती प्रियांका

पॉडकॉस्ट शो आर्मचेयर एस्क्सपर्टमध्ये प्रियांकांन तिच्या बॅालिवुड सोडण्याबद्दल मौन सोडलं होतं.प्रियांका चोप्रा तिचे आयुष्य, कारकीर्द आणि बॉलिवूडमध्ये तिला कसे कोपऱ्यात टाकलं गेलं या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी केली होती. बॉलीवूडने कोपऱ्यात ढकलले गेले आणि तिला हॉलीवूडमध्ये काम कसे शोधावे लागले याबद्दल अभिनेत्री उघडपणे बोलली होती. बॉलिवूडमध्ये मनासारखं काम मिळत नव्हतं, तसंच इंडस्ट्रीतल्या राजकारणामुळं ती नाराज झाली होती. बॉलिवूडमध्ये तिला मिळत असलेल्या भूमिकांबाबत ती समाधानी नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय. त्यामुळे बॉलिवूड सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार सुरु होता. असं तिनं सांगितलं होतं.

गुप्तहेराच्या दमदार भुमिकेत प्रियांका

प्रियांका चोप्राच्या आगामी ‘सिटाडेल’  या सीरीजमध्ये  प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन्स गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्यासोबत स्टॅनले टुसी, लेस्ली मॅनव्हिल, ओसी इखिल, अॅशलेघ कमिंग्स, रोलँड मोलर, काओलिन स्प्रिंगल यांच्याही महत्त्वाच्या भुमिका आहेत. अॅमेझॉन स्टुडिओ, गोझी एजीबीओ आणि मिडनाईट रेडिओ यांनी संयुक्तपणे स्पाय थ्रिलरची निर्मिती केली आहे. ही वेब सिरीज 28 एप्रिलपासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.