‘या’ चित्रपटापासून प्रियांकानं केली होती करिअरला सुरुवात; आज 22 वर्ष पुर्ण, शेअर केला खास फोटो!

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत सुपरस्टार थलपती विजय दिसत आहे.

  अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. नेहमी विविधांगी भुमिका करण्यावर विश्वास ठेवणारी देसी गर्ल नेहमीच चर्चेत असते. आता   प्रियांकानं तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. प्रियंकाने तिच्या करिअरची सुरुवात तमिळ चित्रपट ‘थमिजान’ (thamijan) मधून केली होती. हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.  प्रियंकाने या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इक फोटो शेअर केला आणि चित्रपटाच्या रिलीजला 22 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

  22 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा

  प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत सुपरस्टार दलपती विजय दिसत आहे. हे पूर्णपणे न पाहिलेले चित्र आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की विजयने ‘थमिजान’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या फोटोद्वारे प्रियांकाने तिच्या 22 वर्षांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. प्रियांका चोप्रा आणि विजय व्यतिरिक्त, संगीतकार डी इमान आणि आणखी एक व्यक्ती देखील चित्रात दिसत आहे.

  ‘अंदाज’ हा प्रियांकाचा पहिला हिंदी चित्रपट

  प्रियांका चोप्राने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. दोन वर्षांनंतर त्यांनी ‘थमिजान’मधून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी त्याने ‘अंदाज’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांनीही काम केले होते.

  प्रियांकाचं वक्रफ्रंट

  प्रियांका तिचा आगामी चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट्स’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचे शूटिंग फ्रान्समध्ये होत आहे. ‘थामिजान’शी संबंधित फोटोंशिवाय प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये मुलगी मालती मेरीचे फोटोही शेअर केले आहेत. मालती खेळण्यातील कॅमेरासोबत खेळताना दिसत आहे. प्रियांकाच्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा आई आणि मुलीचे मजेदार फोटो पाहायला मिळतात.