प्रियांकानं शेअर केला मुलीचा फोटो, कुणी म्हण्तयं क्यूट बेबी तर कुणी म्हण्तयं परी..

प्रियांकानं यापुर्वीही अनेकदा मुलीचा फोटो शेअर केला आहे. मात्र तीनं कधीही तिचा चेहरा नीट दाखवला नाही.

    नुकतीचं भारतात येऊन गेलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) परदेशात गेल्यावर पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली आहे. इथून गेल्यानंतर प्रियंकानं आता लेकीचा फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमामे या फोटोतही तिच्या लेकीचा चेहरा दिसत नसला तरीही या फोटोवर नेटकरी भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

    “मला म्हणायचंय…” असं कॅप्शन देत प्रियंकान इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे. या फोटोत प्रियंकाची लेक मालती झोपलेली दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचं स्वेटर घातलं असून क्यूट अशी गुलाबी रंगाची टोपी घातली आहे. या फोटोत ती खूपच गोड दिसत आहे. या फोटोने नेटकऱ्यांनाही भुरळ घातली असून चाहते कंमेट्स करताना दिसत आहेत. “ओह शेवटी…इतकी सुंदर बाळ” अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर काहींनी “सुंदर राजकुमारी” “ती खूप सुंदर आहे” असेही म्हटले आहे.

     

    निक जोनससोबत प्रियांका 1 डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकली. राजस्थानात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. तर 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निक सरोगेसीद्वारे आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास मालती मेरी असं लेकीचं नाव ठेवलंय.