प्रियंका चोप्राने मदर्स डे ला लेक मालतीचा क्यूट व्हिडिओ केला शेअर, पतीसोबतही काढला सेल्फी!

प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीचा एक गोंडस व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कायम चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आणि वैयत्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे तीची मुलगी मालतीमेरी सोबतचे फोटो ती नेहमी सोशल मीडीयावर शेअर करत असते. प्रियंकाचं तिच्या लेकीसोबत किती छान बॅान्डीग आहे हे त्यांच्या फोटोवरून कळतचं. आज मदर्स डे च्या औचित्यावर तिने तिच्या लेकीचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने पती निक जोनाससोबती छान वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहे.

  मालती मेरीचा क्यूट व्हिडिओ

  प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीचा एक गोंडस व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मालती रंगाच्या पुस्तकासोबत खेळताना दिसत आहे आणि जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा तिच्या चाहत्यांना तिचा क्यूट लुक खूपच आवडला होता.

  प्रियांकाने निकसोबतचा शेअर केला सेल्फी

  प्रियांका आणि निकच्या या सेल्फीची खास गोष्ट म्हणजे दोघेही खूप वेळ एकत्र बोलत आहेत. कारण प्रियंका तिच्या ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटात व्यस्त असल्यामुळे निकसोबत वेळ घालवू शकली नाही. प्रियांका आणि निकच्या या सेल्फीमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. दोघांनी स्वेटशर्ट घातलेले आहेत आणि दोघांनीही त्यांचे आरामदायक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काही तासांपूर्वीच प्रियांकाने दोघांचा (प्रियांका-निक) एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अशा रात्री’. प्रियांका आणि निकच्या या उबदार छायाचित्रातून स्पष्टपणे दिसून येते की या दोघांनीही खूप दिवसांनी एकत्र चांगला वेळ घालवला आहे.

  प्रियांकाचं वर्कफ्रंट

  सध्या प्रियांका चोप्रा तिच्या आगामी चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’ची शूटिंग करत आहे. याशिवाय गेल्या महिन्यात त्यांनी ‘ब्लफ’ चित्रपटाचीही घोषणाही केली होती. तिचा आवाज असलेली टायगर डॅाक्युमेंट्री रिलीज झाली असून डिस्नेप्लस हॅाटस्टारवर तुम्ही ती पाहू शकता. नुकतीच प्रियांका चोप्रा भारत दौऱ्यावर होती. यावेळी त्यांनी कुटुंबासह येथे होळीचा सणही साजरा केला. याशिवाय तिने अयोध्येत सहकुटुंब जाऊन राम मंदिरालाही भेट दिली होती.