शुटींग दरम्यान जखमी झाली प्रियंका चोप्रा? रक्त लागलेल्या चेहऱ्याचा फोटो पाहून फॅन्स चिंतेत!

'हेड्स ऑफ स्टेट' हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांकाची शूटिंग फ्रान्समध्ये होत आहे. शूटिंगमधून वेळ काढून प्रियंकाही मालतीसोबत फ्रान्सला भेट देण्यासाठी बाहेर पडते.

  एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कायम चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आणि वैयत्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रियांका नुकतीच भारतातून अमेरिकेत परतली आहे.  अमेरिकेत जाताच प्रियंकानं आता कामचा धडाका सुरू केला आहे. प्रियांकनं नुकतचं तिच्या नव्या चित्रपटाच्या शुटींगसेटवरील काही फोटो शेअर केले आहे. मात्र, हे फोटो पाहून चाहत्यांना प्रियकांची काळजी वाटू लागली आहे. काय आहे या फोटोमध्ये बघुयां.

  प्रियांकाच्या चेहऱ्यावर दुखापत?

  यावेळी प्रियांकाने तिच्या नव्या चित्रपटाच्या शुटींग सेटवरचे फोटो इन्स्टास्टोरीला पोस्ट केले आहेत. सेटवर शूटिंग करताना झालेल्या दुखापतीचा फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये बरेच ओरखडे दिसत आहेत. नुसता तिचा चेहरा बघून असे वाटते की, स्टंट करताना प्रियांकाला दुखापत झाली आहे.

  प्रियांकाने रक्ताने माखलेला चेहरा दाखवला

  इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि कपाळावर रक्ताचे ठिपके दिसत आहेत. तिला फार दुखापत झालेली नाही, पण जखम गंभीर आहे. ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा ॲक्शन चित्रपट आहे. यामध्ये प्रियंका धोकादायक ॲक्शन सीन आणि स्टंट करताना दिसत आहे.
  हा फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ‘मागील काही वर्षांत मी जखमींचे किती फोटो पोस्ट केले असतील हे मला माहीत नाही.’

  प्रियांकाचं वर्कफ्रंट

  प्रियांका चोप्रा नुकतीच तिच्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत आली होती. मग समजलं की ती कुठल्यातरी प्रोजेक्टच्या संदर्भात आली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘जी ले जरा’मध्ये काम करत असल्याचे समोर येत आहे. तथापि, अद्याप काहीही ऑनबोर्ड नाही. याशिवाय ‘टायगर’ 22 एप्रिलला डिस्नेवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियांकाने व्हॉईस ओव्हर केला आहे.

  ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांकाचे स्टंट सीन्सही आहेत. त्याचे शूटिंग फ्रान्समध्ये होत आहे. शूटिंगमधून वेळ काढून प्रियंकाही मालतीसोबत फ्रान्सला भेट देण्यासाठी बाहेर पडते.