प्रियांका चोप्रा झळकणार हॉलीवूड चित्रपटात, ‘द ब्लफ’ मध्ये साकारणार मुख्य भूमिका, जूनपासून सुरू होणार शूटिंग!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने 'द ब्लफ' नावाचा हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे. अभिनेत्रीचा चित्रपट 1800 च्या दशकावर आधारित पीरियड ड्रामा आहे.

    ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा सध्या (Priyanka Chopra) यशाच्या उच्च शिखरावर आहे. अभिनेत्री बॅक टू बॅक हॉलीवूड प्रोजेक्ट्स साइन करत आहे. नुकतचं ‘देसी गर्ल’  अ‍ॅक्शनपॅक वेबसिरिज ‘सिटाडेल’मध्ये दिसली होती. येत्या काही दिवसात ती अ‍ॅक्शन-पॅक स्पाय थ्रिलर मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने आणखी एक हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे, जो 800 दशकातील एक पिरीयड ड्रामा आहे.

    ‘द ब्लफ’मध्ये दिसणार प्रियांका !

    प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट आहेत. आता प्रियांकाने आणखी एक हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने ‘द ब्लफ’ नावाचा हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग जून महिन्यात सुरू होणार आहे. ‘द ब्लफ’ चित्रपटाची निर्मिती द रुसो ब्रदर्स करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रियकांने आणि निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

    प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट

    प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिच्याकडे दोन हॉलीवूड प्रकल्प आहेत, त्यापैकी एक ‘सिटाडेल 2’ आणि ‘हेड्स ऑफ स्टेट’ आहे. याशिवाय तिच्याकडे ‘जी ले जरा’ नावाचा बॉलिवूड चित्रपटही आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत प्रियांका चोप्रा दिसणार आहे.या चित्रपटाची निर्मिती रीमा कागतीने केली आहे. निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.