बेघर मुलांना पाहून प्रियांका चोप्राचं मन भरून आलं, अवस्था पाहून…

प्रियांका चोप्राने अलीकडेच बेघर आणि निराधार मुले आणि महिलांची भेट घेतली. त्यांना पाहून प्रियांका चोप्राच्या डोळ्यात पाणी आले. हा भावूक व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा रोजच चर्चेत असते. आपल्या हॉट स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली प्रियांका सोशल मीडियावर दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते, मात्र यावेळी तिने असे काही शेअर केले आहे की, लोकांच्या डोळ्यात पाणी आला आहे. प्रियंका चोप्रा नुकतीच बेघर मुलांना भेटली आणि त्यांना भेटल्यानंतर अभिनेत्रीला आनंद तर झालाच पण त्याचवेळी तिचे डोळे पाणावले. प्रियांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priyanka (@priyankachopra)

  रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांतील अनेक लोकांची जीवित आणि वित्तहानी होत आहे. रशियापासून प्रत्येक बाबतीत कमकुवत असलेला देश युक्रेन भलेही युद्धात झुकणार नाही, पण तेथील नागरिकांना पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने युक्रेनमधील काही लोकांची भेट घेतली आणि त्यांची अवस्था पाहून अभिनेत्री भावूक झाली. अलीकडेच प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पोलंडमध्ये युक्रेनियन लोकांना भेटताना दिसत आहे.