priyanka - nick

न्यूयॉर्क शहर आता आमची वेबसाईट लाईव्ह आहे, असं प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. प्रियंकाच्या या ट्विटवर तिला जगभरातून लाखो लोकांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहे.

  प्रियांका चोप्रा सध्या परदेशात स्थायिक झालीये. २०१८मध्ये गायक निर जोनससोबत विवाह केला तेव्हापासून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रियांका आथा अभिनेत्रीबरोबरच नवीन क्षेत्रात प्रेवश करत आहे. प्रियंकाने पती निक सोबत मिळून न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरु केलंय. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटला भारतीय नाव देण्यात आलंय. या रेस्टॉरंटला नाव ‘सोना असं असं आहे. प्रियंकाने स्वत: ट्विट करुन आपल्या रेस्टॉरंटची अधिकृत वेबसाईट सुरु झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.

   

  न्यूयॉर्क शहर आता आमची वेबसाईट लाईव्ह आहे, असं प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. प्रियंकाच्या या ट्विटवर तिला जगभरातून लाखो लोकांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहे.

   

  प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये खास काय?

  विशेष म्हणजे प्रियंकाचं हे रेस्टॉरंट भारतीयांसाठी खास असणार आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये भारतातील सर्व पदार्थ बनवून मिळणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंकाने आपल्या रेस्टॉरंटच्या इंटीरियरकडे चांगलं लक्ष दिलंय. हे रेस्टॉरंट लहान जरी असलं तरी खूप सुंदर बनवण्यात आलंय. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे रेस्टॉरंट सुरु केलं जाण्याची शक्यता आहे.

  काही दिवसांपूर्वी प्रियंका पतीन निक सोबत रेस्टॉरंटमधला फोटो शेअर केला होता. या फोटोत दोघं पूजा करताना दिसले होते. त्यानंतर अखेर प्रियंकाने रेस्टॉरंटबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे