ऑस्कर नामांकित ‘टू किल अ टायगर’ च्या टीममध्ये सामील झाली प्रियांका चोप्रा, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आंनद!

प्रियांका चोप्रासह देव पटेल, मिंडी कलिंग हे देखील कार्यकारी निर्माते म्हणून सामील झाले आहेत.

  अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. नेहमी विविधांगी भुमिका करण्यावर विश्वास ठेवणारी देसी गर्ल नेहमीच चर्चेत असते. आत पुन्हा ती चर्चेत आली आहे. प्रियांकानं तिच्या फॅन्ससाठी एक आंनदाची बातमी शेयर केली आहे. प्रियंका ऑस्कर-नामांकित माहितीपट टू किल अ टायगरच्या टीममध्ये सामील झाली आहे. 2022 मधील ही डोक्युमेंट्रीमध्ये  एका 13 वर्षाच्या मुलीच्या वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे ज्याच्या मुलीवर  लैंगिक अत्याचार होतो, आणि तो तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडच असतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून प्रियंकासह देव पटेल, मिंडी कलिंग हे देखील कार्यकारी निर्माते म्हणून सामील झाले आहेत.

  प्रियंकाची पोस्ट चर्चेत

  प्रियांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की जेव्हा तिने 2022 मध्ये टोरंटोमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा ती पाहून प्रभावित झाली. “टू किल अ टायगर या अकादमी पुरस्कार-नामांकित माहितीपटामागील अविश्वसनीय टीममध्ये सामील होताना आणि निशा पाहुजा दिग्दर्शित या वैशिष्ट्याचे जागतिक वितरण अधिकार नेटफ्लिक्सने संपादन केल्याची घोषणा करताना मला खूप अभिमान वाटत आहे. 2022 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्याच्या मार्मिक कथेने मी ताबडतोब मोहित झाले, ज्यामध्ये एका वडिलांचा आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायिक व्यवस्थेतील धाडसी संघर्षाचे चित्रण करण्यात आले होते.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priyanka (@priyankachopra)

   ‘टू किल अ टायगर’ डॅाक्युमेंट्री बद्दल जाणून घ्या

  टू किल अ टायगर हा भारतातील एकमेव चित्रपट आहे ज्याला सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाने यापूर्वी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फीचर फिल्मसाठी ॲम्प्लिफाई व्हॉईसेस पुरस्कार जिंकला आहे. हा चित्रपट भारतीय वंशाच्या कॅनेडियन चित्रपट निर्मात्या निशा पाहुजा यांनी बनवला आहे.

  चित्रपटाची कथा एका 13 वर्षाच्या मुलीची आहे जिच्यावर तीन लोकांनी अत्याचार केला होता. लग्नाच्या मिरवणुकीतून घरी परतत असताना ही अमानवी घटना घडली. शेतकरी वडिलांनी आपल्या मुलीसोबत घडलेल्या अमानुष आणि अमानुष घटनेला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. आपल्या 13 वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो कसा संघर्ष करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.