लग्नमंडपात पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा झाले भावूक, न पाहिलेला लग्नाचा व्हिडिओ व्हायरल!

लग्नाच्या विधी सुरू असताना पुलकित भावूक होतो. त्याला रडताना पाहून क्रिती खरबंदा त्याला प्रेमाने मिठी मारत त्याला शांत करताना दिसत आहे.

  काही दिवसांपुर्वी अभिनेता पुलकित सम्राट (pulkit samrat) आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा (kriti kharbanda) यांनी हरियाणातील मानसेरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही फोटोही समोर आले होते. आता नुकतचं सम्राट आणि क्रितीच्या लग्नाचा व्हिडिओ समोर (Pulkit kriti wadding video) आला आहे. या व्हिडिओमध्ये हे कपलं भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम व्यक्त करत कमेंट्स केले आहेत.

  पुलकित-क्रितीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

  पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाला एक महिना पुर्ण झाला आहे.मागच्या महिन्यात त्यांनी मोजक्याच मित्र परिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मानेसरमध्ये लग्न केले. या खास प्रसंगी या जोडप्याच्या लग्नाचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. य़ा व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांची झलक दाखवण्यात आली आहे. मेहंदी, हळदी आणि लग्नाची झलक आहे. या खास प्रसंगी हे जोडपे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)

  पुलकित क्रिती झाले भावूक

  पुलकित आणि क्रितीने इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरवातीला पुलकित क्रितीला एक प्रेमपत्र वाचून दाखवतो. त्यांनतर पुलकित त्याच्या नववधूला सर्वत्र शोधताना दिसत होता. ‘ओये दुल्हन’ म्हणत तो आपल्या लेडी लव्हला हाक मारतो. पुलकितचा आवाज ऐकून क्रितीनेही त्याच्याकडे धाव घेत घेते आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर तो क्रिती खरबंदा हिच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे. या व्हिडिओचा हा एक अतिशय सुंदर भाग म्हणजे लग्नाच्या विधी सुरू असताना पुलकित भावूक होतो. त्याला रडताना पाहून क्रिती खरबंदा त्याला प्रेमाने मिठी मारत त्याला शांत करताना दिसत आहे.

  नेटकऱ्यांनी केला कंमेन्ट्सचा वर्षाव

  अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले होते. आता त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओही चाहत्यांच्या खूप आवडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हणलं की हा व्हिडिओ खुपच हृदयस्पर्शी आहे. एकाने म्हण्टलं की तुम्ही आम्हाला  असून फॅन्सही भावूक केलेत.