पंजाबी गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू, २ एप्रिलला प्रदर्शित होणार होतं नवं गाणं!

दिलजानने आजवर अनेक गाणी गायिली आहेत. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याने आधा पिंड, यारां दी गल, शूं करके, हर पल, फर्स्ट लव, मेरा दिल, धरती, तेरे शहर ही गाणी गायिली आहेत. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते.

    लोकप्रिय पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी पहाटे ३च्या सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ दिलजानचा अपघात झाला.

     

    त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिसजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा अपघात कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा तपास पोलीस करत आहेत. गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

    दिलजानने आजवर अनेक गाणी गायिली आहेत. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याने आधा पिंड, यारां दी गल, शूं करके, हर पल, फर्स्ट लव, मेरा दिल, धरती, तेरे शहर ही गाणी गायिली आहेत. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते. या गाण्याचे नाव ‘तेरे वरगे २’ असे आहे. गाण्याबाबत दिलजान अतिशय उत्सुक होता. २ एप्रिल रोजी त्याचे हे गाणे रिलीज होणार होते. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचे निधन झाले.