बॉक्स ऑफिसवर होणार पुष्पा आणि सिंघम या दोन चित्रपटांची टक्कर, पाहायला मिळेल कमाईची शर्यत, कोण मारणार बाजी?

मागील काही दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ ची प्रचंड चर्चा सुरु आहे.

    पुष्पा-२ vs सिंघम अगेन : सध्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची दमदार सुरुवात पाहायला मिळत आहे. बॉलीवूड मधील चित्रपटांची शर्यत पाहायला मिळत आहे. कोणता चित्रपट किती कोटींचा गल्ला जमावणार याकडे सर्वांचे सध्या लक्ष आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपट धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे बरेच चित्रपट सध्या चर्चेत आहेत. अनेक चित्रपटांनी ५०० कोटींचा गल्ला जगभरामध्ये कमावला आहे. त्यामध्ये सनी देओलचा गदर २ आणि शाहरुख खानचा पठाण आणि जवान चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

    मागील काही दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ ची प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकतीच तरण आदर्शन यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, अजयच्या ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता ‘सिंघम अगेन’ की पुष्पा-२ या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘CONFIRMED’,आता सिंघम अगेन विरुद्ध पुष्पा-२ होणार आहे.’ तरण आदर्श यांच्या या ट्वीटला कमेंट करुन कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याबाबत नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.