पुु्ष्पा फेम अभिनेत्यानं दिली गुन्ह्याची कबुली, ब्लॅकमेल करण्यावरुन एका महिलेनं केली होती आत्महत्या!

आता जगदीशने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यासोबतच त्याने कबूल केले की त्याने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो चुकीच्या हेतूने काढले. इतकच नाही तर हे फोटो लीक करेल अशी धमकी देत तिला ब्लॅकमेलही केले.

  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’मध्ये त्याच्या मित्र केशवची भूमिका साकारणारा अभिनेता जगदीश प्रताप भंडारी (Jagadeesh Bhandar) काही दिवसापासुन चर्चेत आहे. एका ज्युनियर आर्टिस्ट महिलेला ब्लॅकमेल करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला पुंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नवी अपडेट आली आहे. आता जगदीशने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने कबूल केले की त्याने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो चुकीच्या हेतूने काढले. इतकच नाही तर हे फोटो लीक करेल अशी धमकी देत तिला ब्लॅकमेलही केले.

  नेमकं प्रकरण काय

  जगदीशने ज्युनियर आर्टिस्टचे महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबरला तिने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसाठी जगदीशला जबाबदार धरत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी जगदीशला कलम 306 अंतर्गत अटक केली. त्यानंतर  जगदीशची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

  काय म्हणाला जगदीश

  जगदीशने कबूल केले की, ती महिला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात होती. जे त्याला आवडले नाही. जगदीश त्या महिलेला पाच वर्षापासून ओळखत होता. मात्र ‘पुष्पा’ नंतर ते दोघे वेगळे झाले होते. मात्र तो त्या महिलेला ब्लॅकमेल करत राहिला आणि शेवटी कंटाळून त्या महिलेने आत्महत्या केली.

  जगदीश प्रताप भंडारी यांचे चित्रपट

  जगदीश प्रताप भंडारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जगदीश प्रताप भंडारीने 2018 साली ‘निरुदययोग नातुलू’ या वेब सिरीजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो तेलुगु चित्रपट ‘पलासा 1978’ मध्ये दिसला. जगदीश शेवटचा ‘सत्थी गणी रेंदू येकरलू’ या नाटकात दिसला होता. जगदीशला खरी ओळख ‘पुष्पा’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्याने अल्लू अर्जुनचा मित्र केशवची भूमिका साकारली होती, जो नेहमी त्याच्यासोबत दिसत होता. जगदीश ‘पुष्पा 2’ या चित्रपटातही दिसणार आहे.