‘या’ दिवशी रिलिज होणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, रणदीप हुड्डानं व्हिडिओ शेअर करत दिली माहिती!

रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. आता रणदीपने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

  हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा (Radeep Hooda) हा विविधांगी भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. तो नेहमीच त्याच्या अभिनेयानं प्रेक्षकांच मनं जिकंत असतो. त्याचा आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar ) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच रणदीपनं जाहीर केली आहे. तसेच एक खास व्हिडीओ देखील रणदीपनं शेअर केला आहे.

  कधी रिलीज होणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’

  रणादिपचा स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट अनेक दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीपनं स्वता:चं केलेलं ट्रान्सफॅारमेशनही चांगलच चर्चेत आहे. प्रेक्षकही त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यास आतूर आहेत. अशातच रणदीपनं  ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटानं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “अखंड भारत – स्वातंत्र्य वीर सावरकरांचे स्वप्न, भारताचे वास्तव -दूरदर्शी नेत्याला श्रद्धांजली, ज्याची कथा जिवंत गाडली गेली.” ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे.

  रणदीपनं शेअर केला व्हिडीओ

  सोशल मिडियावर रणदीपनं एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामधील डायलॅाग लक्ष वेधून घेत आहे. “मुझे गांधी से नहीं, अहिंसा से नफरत है।” हा डायलॉग ऐकू येतो. या व्हिडीओला रणदीपनं कॅप्शन दिलं, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन नायक,एक सेलिब्रेटेड होते आणि एक इतिहासातून पुसले गेले. शहीद दिनी इतिहास पुन्हा लिहिला जाईल. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

  रणदीपने केलं ट्रान्सफॅारमेशन

  रणदीपनं ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी  तब्बल 18 किलो वजन कमी केलं, असं म्हटलं जात होतं. पण याबाबत आता आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, रणदीपनं 26 किलो वजन कमी केले आहे. ते म्हणाले, “जेव्हा रणदीप हा माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासून तो चित्रपटातील या व्यक्तिरेखेचा अभ्यास करु लागला. त्यानं एक खजूर आणि एक ग्लास दूध असा डाएट फॉलो केला. रणदीपनं 4 महिने हा डाएट फॉलो केला”