प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘राधेश्याम’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार रिलीज

कोरोना आणि लॅाकडाऊनचा फटका ‘राधेश्याम’(Radheshyam) चित्रपटालाही बसला आहे. यापूर्वी प्रदर्शनाची तारीख घोषित होऊनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. यापूर्वी ३० जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता पुढल्या वर्षी १४ जानेवारीला प्रदर्शित(Radheshyam Release Date) होणार आहे.

    प्रभास (Prabhas)आणि पूजा हेगडे(Pooja Hegde) अभिनीत ‘राधेश्याम’च्या(Radheshyam) घोषणेपासूनच प्रेक्षकांममध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकतेचं वातावरण आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनचा फटका या चित्रपटालाही बसला आहे. यापूर्वी प्रदर्शनाची तारीख घोषित होऊनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. यापूर्वी ३० जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता पुढल्या वर्षी १४ जानेवारीला(Radheshyam Release Date) प्रदर्शित होणार आहे.

    हैदराबादसह इटली आणि जॅार्जियातील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेला हा चित्रपट एक प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात प्रभास दशकभरानंतर पुन्हा एकदा रोमँटिक मूडमध्ये दिसणार आहे. याच कारणामुळं प्रभासचे चाहते हा रोमँटिक-ड्रामा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी जाहीर केलेल्या तारखेवरच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. १४ जानेवारी हा दक्षिणेत एक मोठा वीकेंड आहे. या दिवशी पोंगल हा या चित्रपटासाठी खूपच शुभ दिवस लाभला आहे.

    वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पोस्टर्समुळे चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘लवर बॉय’ अवतारातील प्रभासची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रोमँटिक शहर इटलीच्या सुंदर बॅकड्रॉपने हा उत्साह द्विगुणित केला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक विंटेज, ओल्ड स्कूल आणि ड्रीमी वाइब्सचा समावेश असून, प्रभास-पूजाची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे.