
राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात(Pornography case ) अटक झाली होती. या प्रकरणात राज कुंद्रा याला सप्टेंबर महिन्यात जामीन (bail) मिळाला. नुकताच राज कुंद्रा त्याची पत्नी शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty And Raj Kundra Photos Viral) मंदिरामध्ये जाताना दिसला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case ) अटक झाली होती. या प्रकरणात राज कुंद्रा याला सप्टेंबर महिन्यात जामीन (bail) मिळाला. नुकताच राज कुंद्रा त्याची पत्नी शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty And Raj Kundra Photos Viral) मंदिरामध्ये जाताना दिसला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा तुरुंगातून परतल्यापासून मीडियापासून दूर होता.मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच त्याच्या पत्नीसोबत कॅमेरासमोर आला.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी हिने पती राज कुंद्रासोबत हिमाचल प्रदेशातील विविध मंदिरांमध्ये गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हिमाचल प्रदेशच्या स्थानिकांसोबत फोटो पोज दिली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दोन महिन्यांपासून कुंद्रा कोठडीत होता. दोन महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर आता शिल्पा आणि राज देवदर्शन करताना दिसून आले.