उद्योगपती राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच, परदेशात असल्यामुळे पोलिसांचं शोधकार्य सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांनी आपल्या ॲपचे वापरकर्ते 3 पट आणि 2 वर्षात 8 पट नफा वाढवण्यासाठी पूर्ण योजना तयार केली होती. त्याला त्याच्या 119 चित्रपटांचा संपूर्ण संग्रह 8.84 कोटी रुपयांना विकायचा होता, राज कुंद्राचे पहिले ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आले होते.

    मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच आहेत. याबाबत अलीकडेच पोलिसांनी या प्रकरणाचे १५०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीचे नावही आले आहे.

    पोलिसांनी सांगितले की तो लंडनमध्ये राहतो, यामुळे त्याला पकडले गेले नाही. न्यूफ्लिक्स ॲपवरही ॲडल्ट कंटेंट विकला गेला होता, जे हे ॲप चालवणारा यश ठाकूर मूळचा कानपूर, यूपीचे रहिवासी असून सध्या सिंगापूरमध्ये आहे. ज्यामुळे पोलिसांनी त्याला अद्याप पकडले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांनी आपल्या ॲपचे वापरकर्ते 3 पट आणि 2 वर्षात 8 पट नफा वाढवण्यासाठी पूर्ण योजना तयार केली होती. त्याला त्याच्या 119 चित्रपटांचा संपूर्ण संग्रह 8.84 कोटी रुपयांना विकायचा होता, राज कुंद्राचे पहिले ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आले होते.

    कुंद्रा डिजिटल माध्यमांमधून बेकायदेशीर पैसे कमवणार होता, परंतु जेव्हा पोलिसांनी राजला पकडले आणि त्याच्या योजनेचा भांडाफोड झाला, त्यानंतर त्याने सर्व माहिती हटवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.