“तुझ्यावर कोणी बलात्कार केला आहे का?”अश्लील प्रश्न विचारणाऱ्यावर शालू भडकली म्हणाली…

“तुझ्यावर कोणी बलात्कार केला आहे का?” असा विचित्र प्रश्न एका नेटकऱ्यानं कमेंट सेक्शनमध्ये तिला विचारला. अन् त्याच्या या प्रश्नावर काही नेटकऱ्यांनी अश्लील विनोद केले. हा सर्व प्रकार पाहून राजेश्वरी संतापली.

    नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातून पुढे आलेली राजेश्वरी खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिची या चित्रपटात साकारलेली शालू ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. रुपेरी पडद्यावर एका साध्या सरळ मुलीच्या रुपात झळकलेली शालू खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करताना दिसते. या फोटोंवर चाहते देखील कौतुकाचा वर्षाव करतात.

    मात्र सोशल मीडियावर काही मंडळी कारणाशिवाय तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील करतात. तिच्या फोटोंवर अश्लील विनोद केले जातात. असाच प्रकार करणाऱ्या काही नेटकऱ्यांना आता स्वत: राजेश्वरीनं खडे बोल सुनावले आहेत. “तुझ्यावर कोणी बलात्कार केला आहे का?” असा विचित्र प्रश्न एका नेटकऱ्यानं कमेंट सेक्शनमध्ये तिला विचारला. अन् त्याच्या या प्रश्नावर काही नेटकऱ्यांनी अश्लील विनोद केले. हा सर्व प्रकार पाहून राजेश्वरी संतापली.

     

    राजश्री म्हणाली..

    “हे अशी कमेंट करणारे आणि त्यांना अशा प्रकारचे रिप्लाय देणारे, तुम्ही कसे काय जन्माला येतात रे?? मनुष्य तुमच्यासारखे तरी नसतात, त्यांची लायकी खूप मोठी आहे तुमच्या पेक्षा. असला घाणेरडापणा माझ्या पोस्टवर मला नकोय, आपल्या आई-वडिल, बहिण, भाऊ, यांना हे प्रश्न करा, ते नक्की उत्तरे देतील कारण संस्कार आई वडिलच देतात. किती हिम्मत म्हणजे एखाद्या मुलीच्या पोस्टवर अशा कमेंट्स करणे, वाह आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही यांना. लायकी आहे का राजे महाराजांचे प्रोफाईल फोटो ठेवायची.” अशा शब्दात राजेश्वरीनं या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं.