rajnikant

रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना हैदराबाद अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेले दोन दिवस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयानं एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करुन ही आनंदाची बातमी रजनीकांत यांच्या चाहत्यांना दिली आहे.

दक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांना तीव्र रक्तदाबाचा त्रास झाल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या काही आरोग्य चाचण्याही करण्यात आल्या. रुग्णालयात त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता त्यांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. परंतु अन्नाथे (Annaatthe) या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना २२ डिसेंबरला रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.

यानंतर शुक्रवारी रुग्णालायात दाखल झाल्यानंतर पून्हा एकदा त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. कोव्हिड-१९ची कोणतीही लक्षण त्यांना आढळून आली नाहीत.तसंच त्यांना सध्या इतर कसलाही त्रास जाणवत नसल्यामुळे रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.