अन्नाथे हा सुपस्टार रजनीकांतचा ९ वा सिनेमा आहे, ज्याने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शिवा याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात कीर्ती सुरेशने रजनीकांतच्या बहिणीची भूमिका केली आहे. याशिवाय खुशबू सुंदर, मीना आणि जगपथी बाबू हेही महत्त्वाच्या रोलमध्ये सिनेमात आहेत. हा सिनेमा पैद्दन्ना नावाने तेलगूतही डब करण्यात आला आहे.
मुंबई- सुपरस्टार रजनीकांतचा नुकतीच रीलिज झालेला सिनेमा अन्नाथेने, चार दिवसांत १७४ कोटी रुपये कमवले आहेत. या सिनेमाने तामिळनाडूत जबरदस्त कमी केल्याची माहिती चित्रपट समिक्षकांनी दिली आहे. दिवाळी विकेंडंमध्ये सिनेमा रीलिज झाल्याने, सिनेमाला त्याचा मोठा फायदा मिळाला आहे. सुट्ट्या असल्याने अनेकजण सिनेमा पाहण्यासाठी थिएटर्समध्ये आले. आता दिवाळीनंतर हा सिनेमा किती मोठा गल्ला जमवतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
१०० कोटींपेक्षा जास्त कमी करणारी रजनीकांतचा नववा सिनेमा
अन्नाथे हा सुपस्टार रजनीकांतचा ९ वा सिनेमा आहे, ज्याने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शिवा याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात कीर्ती सुरेशने रजनीकांतच्या बहिणीची भूमिका केली आहे. याशिवाय खुशबू सुंदर, मीना आणि जगपथी बाबू हेही महत्त्वाच्या रोलमध्ये सिनेमात आहेत. हा सिनेमा पैद्दन्ना नावाने तेलगूतही डब करण्यात आला आहे.
सूर्यवंशीला टाकले मागे
अन्नाथेसोबतच अभय आणि कतरिना स्टारर सूर्यंवंशी सिनेमाही रीलिज झाला होता. सुरुवातीच्या वीकेंडला सूर्यंवशीने ७७ कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूडसाठी हा आकडा मोठा असला तरी रजनीकांतच्या सिनेमासमोर ही कमाई कमी आहे.
नुकतीच झाली रजनीकांत यांची सर्जरी
काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांना चैन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर मेंदुतील रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठीचे ऑपरेशन करण्यात आले.
सिनेमाचा राजा रजनीकांत, राजकारणात मात्र अपयशी
वयाची सत्तरी गाठली तरीही रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा आजही कायम आहे. मात्र राजकारणात एन्ट्री करुनही तिथे ते चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. प्रकृती चांगली नसल्याने निवडणुकांच्या राजकारणमात न उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ३ डिसेंबर २०२०ला त्यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा करत २०२१ साली विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले होते. ३१ डिसेंबरला पार्टीची घोषणा होणार होती, मात्र असे होऊ शकले नाही. २६ दिवसांतच रजनीकांत यांनी राजकारणाचा नाद सोडून दिला.