rajkumar rao ganpati

गणेशोत्सवासाठी अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यानेही खास तयारी केली आहे.

    गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह सध्या सगळीकडे दिसतोय. घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणेशोत्सवासाठी अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यानेही खास तयारी केली आहे. दरवर्षी तो स्वतःच्या हाताने बाप्पा साकारतो. यावर्षीचा गणेशोत्सवही त्याच्यासाठी खास आहे कारण त्याने इको फ्रेंडली बाप्पा आपल्या घरी आणला आहे. सणासुदीची तयारी करत असताना राजकुमार राव गणेश चतुर्थी एकदम निसर्गाची काळजी घेऊन साजरी करत आहे. (Eco Friendly Ganpati)

    गव्हाच्या पिठाचा बाप्पा आणि हळदीचा रंग
    राजकुमार रावच्या गणपतीची खासियत म्हणजे दरवर्षी तो प्राथमिक साहित्य म्हणून गव्हाचा वापर करून स्वतःच्या हातांनी गणपतीची मूर्ती बनवतो. अनेक वर्षांपासून तो ही परंपरा पुढे नेतोय. बारीकसारीक तपशिलांसाठी राजकुमार राव बाप्पाच्या मूर्तीचे भावपूर्ण डोळे तयार करतो. मसूर डाळीचा वापर तो मूर्ती सुशोभित करण्यासाठी करतो. तसेच बीन्सचाही तो वापर करतो. मूर्तीला रंग देण्यासाठीही नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याची त्याची जाणीवपूर्वक निवड ही त्याच्या उत्सवात वेगळीच जादू निर्माण करते. मूर्तीला सुशोभित करण्यासाठी तो हळदीचा वापर करतो आणि बाप्पाच रंगकाम करतो.

    राजकुमार राव गणेशोत्सव इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.