राजकुमार राव आणि जान्हवीची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘माही’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूरच्या माही चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात क्रिकेटप्रेमी असलेल्या एका जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

  अभिनेता राजकुमार राव (Raj kumar Rao) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा श्रीकांत चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॅाक्स ऑफिसवरी हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. नुकतंच राजकुमार रावच्या मिस्टर अँड मिसेस माही (Mr. Mrs Mahi) या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. यामध्ये एका क्रिकेटवेड्या जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय

  जान्हवी कपूर आणि राजकुमार राव अभिनीत  मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात एका क्रिकेड वेड्या असलेल्या तरुणाची गोष्ट आहो ज्याला क्रिकेटचं खुप वेडं असतं पण काही कारणामुळे त्याचं क्रिकेटमध्ये करीअर करण्याचं त्याचं स्वप्न  पुर्ण होऊ शकत नाही. त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच हे अपुर्ण राहिलेलं स्वप्न तो क्रिकेटवेडी असलेल्या त्याच्या बायकोच्या माध्यामातून पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला अनेक अडचणींचा सामना कराव लागतो. अखेर त्याचं स्वप्न पुर्ण होत का हे माहित करुन घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघावी लागणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

   या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

  राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची धमाला केमेस्ट्री असलेला हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार आणि जान्हवी व्यतिरिक्त अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, जरीन वहाब यांची महत्त्वाची भूमिका आहे. यापुर्वी हे दोघं रुही चित्रपटात एकत्र दिसले होते मात्र चित्रपटाला हवा तसा रिस्पॅान्स मिळाला नव्हता. पण ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात पुन्हा ते एकत्र दिसणार आहेत.