‘माझ्यावर प्रँक करण्यात आला’, प्लॅस्टिक सर्जरीच्या अफवांवर अखेर बोलला राजकुमार! बदललेल्या लूकचं सांगितलं सत्य!

राजकुमार म्हणाला, 'तुम्ही तो फोटो पाहिला असेल तर तो माझ्यासारखा दिसत नाही. मला वाटते की कोणीतरी माझी खोड काढली आहे. मला खात्री आहे की तो फोटो ए़़डीट केला गेला आहे.

  बॉलिवूड स्टार राजकुमार राव (Rajkummar Rao) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट श्रीकांत प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात त्यांन एका दिव्यांगाची भुमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर पाहिल्यानंतर राजकुमार रावचं कौतुक होत असताना आता नुकतंच त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतय. त्याचं कारण म्हणजे नुकतचं राजकुमार एका कार्यक्रमातील एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याची हनुवटी थोडी लांब दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर इंटरनेट लोकांनी राजकुमारवर प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे. याविषयी अखेर राजकुमारने आपलं मौन सोडलं आहे. काय म्हणाला राजकुमार राव बघुया.

  व्हायरल फोटोवर बोलला राजकुमार राव

  राजकुमार म्हणाला, ‘तुम्ही तो फोटो पाहिला असेल तर तो माझ्यासारखा दिसत नाही. हे खरं तर खूप मजेदार आहे कारण ते मी देखील नाही. मला वाटते की कोणीतरी माझी खोड काढली आहे. मला खात्री आहे की तो फोटो एडिट केला गेला आहे.

  राजकुमार पुढे म्हणाला की, जेव्हा हा फोटो व्हायरल होऊ लागला तेव्हा लोकांनी त्याचे जुने फोटो काढून (शस्त्रक्रियेबद्दल) दावे करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘लोक प्लास्टिक सर्जरीसारखे मोठे शब्द वापरत होते, पण मी प्लास्टिक सर्जरी केली नाही. मी करीअरच्या सुरुवातीला जेव्हा लोक माझ्या लूकवर कमेंट करायचे. तेव्हा म्हणजे सुमारे 8-9 वर्षांपूर्वी, मी हे चांगलं दिसण्यासाठी फिलर्स केलेत. जेणेकरून माझा चेहरा संतुलित दिसावा. हे माझ्या त्वचेच्या डॉक्टरांनी करायला सांगितले होते. आणि मला खरंच वाटतं की जर एखाद्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टींची गरज असेल तर का नाही? यामध्ये कोणतेही नुकसान नाही.

  ट्रोलिंगवर व्यक्त केली नाराजी?

  जेव्हा राजकुमारला विचारले गेले की या ट्रोलिंगचा त्याला त्रास झाला का, तेव्हा तो म्हणाला, ‘नाही, कारण ते मजेदार होते. मला माहित आहे की हे बनावट आहे. आणि, ट्रोलर हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करतात. मला वाटते की ही सर्वात वाईट गोष्ट कोणीही करू शकते.

  राजकुमार पुढे म्हणाले की, अभिनेत्यांवर चांगले दिसण्यासाठी नेहमीच दबाव असतो, त्यांच्यासाठी त्यांचे काम नेहमीच ‘प्राधान्य’ असेल. तो म्हणाला, ‘मी अनेक लोकांना ओळखतो जे या सगळ्याचा आनंद घेतात. त्यांना वेषभूषा करणे आणि चांगले दिसणे आवडते. मला काम करायला मजा येते. खरे सांगायचे तर मला वाटते की माणसाने जे काही केले पाहिजे ते त्याला आत्मविश्वास देईल. राजकुमार रावचा पुढील चित्रपट ‘श्रीकांत’ मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.