भारतीय शिक्षण व्यवस्थेविरुद्ध लढणार राजकुमार राव, श्रीकांतचा दमदार ट्रेलर रिलीज!

राजकुमार रावचा बहुप्रतिक्षित चित्रपट श्रीकांतचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता श्रीकांत बोलाच्या भूमिकेत दिसत आहे.

  गेल्या अनेक दिवसापासून सिनेसृष्टीत बायोपिकवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचीही मोठ्या प्रमाणावर पंसती मिळते. नुकताचं 12 वी फेल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं. आता पुन्हा एक बायोपिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. श्रीकांत असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर मंगळवारी रिलीज (Srikanth trailer) करण्यात आला. बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) मुख्य भुमिकेत असून त्याचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

  दमदार भुमिकेत दिसणार राजकुमार राव

  हा चित्रपट म्हणजे दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोला यांची कथा आहे. ट्रेलरमध्ये राजकुमार एका दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो लहानपणापासून पाहू शकत नाही. त्यांना बघता येत नसेल पण त्यांची स्वप्ने मोठी आहेत. श्रीकांत अभ्यासात खूप हुशार आहे. मात्र अंध असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

  भारतीय शिक्षण व्यवस्थेविरुद्ध लढणार राजकुमार 

  त्याला 12वी मध्ये 98% गुण मिळाले होते, त्यानंतर त्याला पुढे विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. मात्र तो दिव्यांग असल्याने त्याला पुढील शिक्षण घेऊ दिले जात नाही. अशा परिस्थितीत श्रीकांतने ठरवले की तो आता भारतीय शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणार आणि गुन्हा दाखल करणार. याशिवाय ट्रेलरमध्ये इतरही अनेक दृश्ये दाखवण्यात आली असून त्यात दिव्यांगांच्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत.

  ट्रेलर चाहत्यांच्या पंसतीस

  ट्रेलरवर पाहिल्यानंतर प्रत्येक जण राजकुमार रावच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक करत आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 10 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

  कोण होते श्रीकांत बोला?

  चित्रपटात दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोला यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्यांना विज्ञानात खूप रस होता. एमआयटीमधून मॅनेजमेंट सायन्सची पदवी घेतल्यानंतर श्रीकांतने एक उद्योग स्थापन केला जिथे त्याच्यासारख्या लोकांना रोजगार मिळू शकतो. विशेष म्हणजे त्यांच्या स्टार्टअपमध्ये पहिली गुंतवणूक राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी केली होती.