रजनीकांतच्या ‘जेलर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ॲडव्हान्स बुकींगमधून तगडी कमाई.. थलयवासाठी फॅन्स क्रेझी

सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा ब्लॅक कॉमेडी Action सिनेमा आहे. रजनीकांत एका कडक जेलरच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकींगने धुमाकूळ घातला आहे. सुमारे 14.18 कोटींचं ॲडव्हान्स बुकींग जेलर सिनेमाचं झालेलं आहे. जवळपास 900 थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झालेला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा 40 ते 45 कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    Jailer Release: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा जेलर सिनेमा (jailer movie) रिलीज झाला आहे. हा सिनेमा ब्लॅक कॉमेडी Action सिनेमा आहे. रजनीकांत एका कडक जेलरच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकींगने धुमाकूळ घातला आहे. सुमारे 14.18 कोटींचं ॲडव्हान्स बुकींग जेलर सिनेमाचं (Jailer movie) झालेलं आहे. जवळपास 900 थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झालेला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा 40 ते 45 कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    रजनीकांतच्या जेलरने थिएटरमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. तब्बल 2 वर्षांनंतर रजनीकांत जेलरच्या भूमिकेतून परतले आहेत. सिनेमाच्या बाहेर रजनीकांत यांच्या चाहत्यांनी फटाके फोडले. मोठ मोठ्या होर्डिंगवर दुधाचा वर्षाव केला. तर कोणी त्यांच्या पोस्टरची पूजा केली. ढोलताशाच्या तालावर रजनीकांत यांचे चाहते डान्सही करताना दिसले. रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमाच्या रिलीजच्या वेळी हेच दृश्य दिसतं.

    जेलरच्या सिनेमाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. शेवटी तो दिवस आला. हा चित्रपट मुळात तमिळ भाषेत बनवला आहे. तो हिंदी आणि इतर भाषांमध्येही रिलीज झाला आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू, जॅकी श्रॉफ, मोहनलाल, विनायकन हे कलाकार आहेत. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकींगच्या आकड्यांवरून चाहत्यांची उत्सुकता लक्षात येऊ शकते. SacNilk च्या अहवालानुसार, जेलर सिनेमाने भारतात 14.18 कोटींचं प्री-बुकिंग केलं आहे. सिनेमाच्या तमिळ आवृत्तीने 5,91,221 तिकिटांच्या विक्रीतून 12.82 कोटींचा नफा कमावला आहे. तेलगू आवृत्तीने 77,554 तिकिटांच्या विक्रीतून ॲडव्हान्स बुकींगमध्ये 1.35 कोटी कमावले आहेत. जेलर तामिळनाडूतील 900 थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे.

    रजनीकांतच्या चाहत्यांसाठी 10 ऑगस्ट हा दिवस एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. चेन्नई आणि बंगळुरू येथील कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सॉफ्टवेअर कंपनी नॅसडॅकचे सीईओ गिरीश माथरुबूथम यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी 2200 जेलर सिनेमची तिकिटे बुक केली आहेत. एवढंच नाही तर जेलर सिनेमा पाहण्यासाठी एक जपानी जोडपं ओसाकाहून चेन्नईला आलेलं आहे.

    महत्त्वाचं म्हणजे सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा ओएमजी 2 शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. जेलर रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर या सिनेमांना कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगचे आकडे जबरदस्त आहेत. व्यापार विश्लेषकांच्या मते, चित्रपट पहिल्या दिवशी 40-45 कोटींचा गॉस कलेक्शन करू शकतो. इतकेच नाही तर रजनीकांतचा भारतातील जेलर पहिल्या 4 दिवसांत 100 कोटींचा आकडा सहज स्पर्श करू शकतो. चित्रपटाच्या कलेक्शनबाबत हे आकडे कितपत खरे ठरले, हे एक दिवसानंतर कळेल.