राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केलं अटक, एका मॉडेलने तिच्यावर केलाय ‘हा’आरोप

राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Video) आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे.  मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    मुंबई: मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेत अटक केली आहे. थोड्याच वेळात पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. आंबोली पोलिसांनी (RakhiSawant Arrest) राखीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Video) आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे.  मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉडेलच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतलं आहे. तिला पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

    मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक ट्वीट शेअर केलं आहे. शर्लिन चोप्राच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

    राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असत. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) विवाह केला. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती सगळ्यांना दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. तिची आई आजारी असल्याचेही तिने सांगितले होते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.

    बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तिच्यावर कायम टीका केली जाते.