आदिल दुर्राणीची क्रूरता सांगता सांगता चक्क बेशुद्ध पडली राखी सावंत, कोणीतरी ओरडलं पर्स…पुढं काय घडलं?

राखीनं आपल्या उद्योगपती नवऱ्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक मुलींशी असलेले संबंध, चुकीचं काम करत असल्याचा आरोप ती करतेच आहे. त्यासह आदिल अत्यंत क्रूरपणे वागत असल्याची तक्रारही तिनं केलीय.

    मुंबई- अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती अदिल दर्राणी (Adil Daraani) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. दोघांमध्ये कॅमेऱ्यासमोरही वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पापा रझ्झीसमोरच फोन स्पीकरवर टाकून राखीनं आदिलला बरचं ऐकवलं होतं. लग्न (Married) झाल्यानंतर काही दिवसांतच पती आदिलनं आपली फसवणूक केल्याचं राखी सांगते आहे.

    पतीच्या विरोधात तक्रार दाखल

    पापारझ्झींसमोर रडत रडत राखीनं आपल्या उद्योगपती नवऱ्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक मुलींशी असलेले संबंध, चुकीचं काम करत असल्याचा आरोप ती करतेच आहे. त्यासह आदिल अत्यंत क्रूरपणे वागत असल्याची तक्रारही तिनं केलीय. तर राखी सावंतचा भाऊ राकेश यानं आईच्या मृत्यूच्या दिवशीच राखीला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात राखी सावंत हिनं मंगळवारी मुंबईतल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात आपल्या पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

    आदिलला बुधवारी कोर्टात हजर करणार

    राखीच्या तक्रारीनंतर आदिलला तत्काळ अटक करण्यात आली असून, आज बुधवारी त्याला कोठडीसाठी अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या सगळ्या काळात राखी पोलीस स्टेशनसमोर बेशुद्ध झाली होती. माध्यमांशी बोलताना ती आपल्या पतीबाबत आणि त्याच्या क्रूरतेबाबत सांगत असतानाच तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

    पर्सच्या ओरड्याने आली राखी शुद्धीत

    राखी सावंत पती आदिलवर आरोप करत असतानाच तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडण्यात आलं. त्यानंतर ती थोडी शुद्धीत आली. अर्धवट शुद्धीत असलेल्या राखीला कारमध्ये जमलेली गर्दी बसवत होती. तेवढ्यात कुणीतरी तिची पर्स राहिल्याचं गर्दीत म्हणालं. त्याबरोबर लगेच राखीला स्फुर्ती आली आणि तिनं तातडीनं आपली पर्स जागेवर आहे की नाही हे तपासलं. त्यावेळी तिनं डोळेही उघडले होते. पर्स व्यवस्थित आहे हे लक्षात आल्यानंतर पुन्हा तिनं आपले डोळे मिटून घेतले. तिच्या या ड्राम्याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरु आहे.