राखी सावंतचा माजी EX Husband आदिल खान दुर्राणी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, बिग बॉस 12 फेम सोमी खानशी केलं लग्न!

राखी सावंतचा पूर्व पती आदिल दुर्राणीने पुन्हा लग्न केले, त्याने जयपूरमधील ‘बिग बॉस १२’ ची माजी स्पर्धक सोमी खानसोबत लग्नगाठ बांधली.

  नेहमी लाईमलाईटमध्ये राहायचा प्रयत्न करणारी राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कारणानी चर्चेत असतेच. नुकतचं तिन अंबानीच्या प्री-वेंडीग सोहळ्याला न बोलावल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन तिला नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं. आता राखी पुन्हा चर्चेत आली आहे. राखी सावंत पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी यानं दुसरं लग्न (Adil Khan Durrani Marries Again) केलं आहे. ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी त्यानं लग्नगाठ बांधली. त्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या लग्नाची बातमी दिली.

  आदिल खाननं सोमी खानशी ३ मार्च रोजी निकाह केला आहे. निकाह पार पडल्यानंतर आदिल आणि सोमी खाननं फोटो शेअर केले. यावेळी नववधू सोमी खाननं लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तर आदिलनं क्रीम आणि सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती. त्यावर चमकदार मरून रंगाच्या पगडी घातली होती. यावेळी दोघंही खुप आंनदी दिसत होते. दोघांनी फोटोग्राफरला फोटोसाठी छान पोजही दिल्यात.

  आमचा निकाह एका साध्या आणि सुंदर समारंभात पार पडला हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. पती-पत्नी या नात्याने आमचा नवा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुखी वैवाहिक जीवनासाठी कृपया आमच्यासाठी पार्थना करा, असं कॅप्शन आदिल खानने शेअर केलेल्या या फोटोंना दिलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)