रकुल-जॅकीच्या घरी लगीनघाई, गोव्यात होणार डेस्टिनेशन वेडिंग; लग्नाची पत्रिका व्हायरल!

19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे. अशातच लग्नाच्या तयारीदरम्यान या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे

    सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. आता बॉलिवूडमधील एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकण्यास सज्ज आहे. बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding) यांच डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार आहे. त्यांच लग्न काही दिवसांपर आलं आहे. रकुल आणि जॅकीच्या घरी लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. आता दोघांच्याही लग्नाचं कार्ड समोर आलं आहे.

    रकुल प्रीत सिंगच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

    रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे. अशातच लग्नाच्या तयारीदरम्यान या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीमवर बनवलेले हे कार्ड आहे.

    खास शैलीत आहे लग्नपत्रिका

    लग्नपत्रिकेत बीच आणि सोफा दिसत आहे. या सोफ्यावर अनेक कुशन ठेवल्या आहेत. हे कार्डचे पहिले पान आहे जे निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीमवर आहे. यासोबतच दुसऱ्या पानावर नजर टाकली तर मंडपाचा फोटो गुलाबी रंगाच्या थीमवर बनवण्यात आला आहे. त्यामध्ये फेरी घेण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2024 लिहिली आहे.